शेतकऱ्यांना दररोज किमान ८ तास अखंडित वीजपुरवठा करावा : आ. अब्दुल सत्तार

Foto
वीज वितरण कार्यालय परिसरात महत्त्वपूर्ण बैठक

सिल्लोड (प्रतिनिधी): वीज वितरण विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज वीज वितरण कार्यालय परीसरात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठ्याची सद्यस्थिती, प्रलंबित वीज कामे, नवीन वीज जोडण्या, वीज खंडित होण्याच्या तक्रारी तसेच शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश दिले. विशेषतः ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, शेतीपंपांना नियमित वीज उपलब्ध करून देणे आणि बिघडलेल्या वीज उपकरणांची दुरुस्ती तात्काळ करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच वीज वितरणाशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या. आगामी काळात वीज व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. 

बैठकीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत ठाम भूमिका मांडत, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना दररोज किमान ८ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना
दिले. वीजपुरवठ्यातील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेतकरी व ग्राहकांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबवा असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. बैठकीत वीज वितरण व्यवस्थेवरील वाढता अतिरिक्त भार लक्षात घेता, आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश
दिले. 

आधीच सिल्लोड साठी येणारी वीज कमी आहे, त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक भारामुळे होणारे वीजखंडित प्रकार तसेच ट्रान्सफॉर्मरवर येणारा ताण याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले, अतिरिक्त भारामुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी, असेही त्यांनी सांगितले. 

बैठकीस वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप दरखडे, कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विठ्ठल सपकाळ, उप कार्यकारी अभियंता प्रदिप काळे, नवज्योत मांडे, सिल्लोड शहर सहाय्यक अभियंता धम्मपाल म्हस्के यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, शेख जावेद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, मेघा शाह, नगरसेविका राजश्री निकम, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर, शेख इम्रान, शेख बाबूभाई, मोहंमद नूर कुरेशी, मुरलीधर राऊत, राजू बाबा काळे, अक्षय मगर, हनिफ मुलतानी, शेख सलीम हुसेन, शेख सलीम भिकन, दिलीप गवळी, लक्ष्मण कल्याणकर, सत्तार बागवान, समाधान साळवे, संभाजी हावळे, अंकुश पाटील यांच्यासह तालुक्यातील वीज वितरण विभागाचे शाखा प्रमुख, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिक उपस्थित होते.